breaking-newsराष्ट्रिय

लॉटरीच्या तिकीटासाठी मॅनेजरने चोरली बँकेतील ८४ लाखांची चिल्लर

लॉटरीची तिकीटे काढण्यासाठी मॅनेजरनेच बँकेतील ८४ लाख रूपयांवर डल्ला मारल्याचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगालमधील मेमारी शहरातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील सिनिअर असिस्टंट मॅनेजरने मागील १७ महिन्यांत बँकेतील तब्बल ८४ लाख रुपयांची चिल्लर चोरल्याचे समोर आले आहे. तारक जयस्वाल असे आरोपी मॅनेजरचे नाव आहे.

तारक जयस्वाल गेल्या आठ वर्षांपासून मेमारीमधील स्टेट बँकेतील ब्रँचमध्ये कार्यरत आहे. जयस्वाल यांच्या कामाबद्दल आजपर्यंत कोणाचीही तक्रार आली नाही. मात्र, त्याने बँकेच्याच पैशांवर डल्ला मारल्याचे कळल्यानंतर त्याच्या सहका-यांना धक्का बसला आहे.लॉटरीचा नाद असेलेल्या तारक जयस्वाल यांच्याकडे बँकेतील रोख रक्कम सांभाळून ठेवण्याची जबाबदारी होती. त्यामुळेच कोणालाही कळू न देता त्याला इतकी मोठी रक्कम लंपास करणे सहजशक्य झाले. तारक जयस्वाल दर महिन्याला १० रुपयांची ५० हजार नाणी चोरत होता. २७ नोव्हेंबरला झालेल्या वार्षिक ऑडिटमध्ये बँकेतील तिजोरीतून लाखो रुपयांची चिल्लर गायब झाल्याचे उजेडात आल्यानंतर संशयाची सुई साहजिकच त्यांच्याकडे वळली. अटक केलेल्या तारकला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button