breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

लॉकडाऊननंतर स्वतःच्या घराचं स्वप्न करणं काहीसं सोपं होण्याची शक्यता

अगोदरच ग्राहकांची वाणवा असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. बिल्डरांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करुन ठेवलेली असताना ग्राहक नसल्यामुळे संपूर्ण पैसा अडकून आहे. सुमारे ६६ हजार कोटींचा शिल्लक साठा असलेल्या बिल्डरांनी आता फ्लॅटवर डिस्काउंट आणि ऑफर्स देण्यास सुरुवात केली आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रात आलेल्या रोकड टंचाईवर मात करण्यासाठी बिल्डरांनी आता सवलतींचा आधार घेतला आहे.

३१ मार्च अखेर ७ प्रमुख शहरांमध्ये तब्बल ७८००० फ्लॅट ( तात्काळ ताबा देण्याजोगे फ्लॅट) शिल्लक आहेत. यात बिल्डरांचे ६६००० कोटी गुंतले आहेत. हे पैसे सोडवण्यासाठी आता बिल्डर कासावीस झाले आहेत. बहुतांश बिल्डरांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लॅटवर डिस्काउंट देत आहेत. अॅनारॉक या संस्थेनेही ग्राहकांना जास्तीत जास्त सवलत देण्याचा सल्ला बिल्डरांना दिला आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर स्वतःच्या घराचं स्वप्न करणं काहीसं सोपं होण्याची शक्यता आहे. बिल्डरांच्या ऑफरसोबतच इतर सवलतीही मिळण्याची शक्यता आहे


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button