breaking-newsक्रिडा

लिसेस्टर सिटीचा विक्रमी विजय

  • इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीग

लिसेस्टर सिटीने साऊदम्प्टनचा ९-० असा धुव्वा उडवून इंग्लिश प्रीमिअर लीगच्या इतिहासात विक्रमी विजयाची नोंद केली. लिसेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सर्वात मोठा विजय संपादन केला.

अयोझ पेरेझ आणि जेमी वार्डी यांच्या हॅट्ट्रिकमुळे लिसेस्टर सिटीने हा दणदणीत विजय मिळवला आहे. बेन चिलवेल, यौरी टिलेमान्स आणि जेम्स मॅडिसन यांनीही विजयात योगदान दिले. लिसेस्टर सिटीने या विजयासह मँचेस्टर युनायटेडच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मँचेस्टर युनायटेडने १९९५मध्ये इस्पिच संघाचा ९-० असा दारुण पराभव केला होता.

या विजयासह ब्रेंडन रॉजर्स यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या लिसेस्टर सिटीने गुणतालिकेत २० गुणांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अग्रस्थानी असलेल्या लिव्हरपूलपेक्षा (२५ गुण) ते फक्त पाच गुणांनी मागे आहेत.

बेन चिलवेल याने १०व्या मिनिटाला पहिला गोल करत लिसेस्टर सिटीचे खाते खोलले. पण घरच्या मैदानावर खेळणाऱ्या साऊदम्प्टनने रायन बेरट्रांडच्या (१२व्या मिनिटाला) गोलमुळे त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर मात्र लिसेस्टर सिटीचे वर्चस्व पाहायला मिळाले. यौरी टिलेमान्सने १७व्या मिनिटाला लिसेस्टर सिटीला आघाडीवर आणल्यानंतर अयोझ पेरेझने १९व्या, ३९व्या आणि ५७व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक साजरी केली.

जेमी वार्डी यानेही ४५व्या, ५८व्या आणि ९०व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक झळकावली. जेमी मॅडिसन याने ८५व्या मिनिटाला गोल झळकावत लिसेस्टर सिटीला विक्रमी विजय मिळवून दिला. घरच्या मैदानावर एखाद्या संघाला इतका दारुण पराभव स्वीकारावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button