breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लाेणावळ्यात वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी ; महामार्गावर वाहनांच्या रांगा

पिंंपरी – वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरता लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत तर भूशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रविवारची सुट्टी एन्जॉय करण्याकरीता आज सकाळपासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने दुपारी बारा वाजता भुशी धरण ते कुमार चौक अशी सुमारे सात किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावर तर सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाल्याने खंडाळा ते लोणावळा व लोणावळा ते वलवण दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुशी धरण व लायन्स पॉइंट या पर्यटन स्थळांवर आज अक्षरशः पाय ठेवण्यास देखील जागा शिल्लक राहिली नव्हती. वाहनांमधून येणाऱ्या पर्यटकांप्रमाणेच रेल्वेगाड्यांना येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने भुशी धरण ते लोणावळा रेल्वे स्थानकादरम्यान पायी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button