breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

लालबागचा सार्वजनिक गणेश मंडळाने मंडपासाठी खोदलेल्या खड्ड्यांपोटी दंड भरला नाही

मुंबई : लालबागचा सार्वजनिक गणेश मंडळाने मंडपासाठी खोदलेल्या खड्ड्यांपोटी महापालिकेने वेळोवेळी ठोठावलेला दंड भरला नाही. त्यामुळे ही रक्कम २१ मार्च २०१८पर्यंत तब्बल ६० लाख ५१ हजार इतकी झाली आहे, असे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. पालिकेनेच ही माहिती दिली असली तरी मंडळाला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा मंडळाने केला आहे.
लालबागचा राजा मंडळाने सन २०१२पासून रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खड्डे खणले होते. मात्र ते खड्डे बुजवण्यात आले नाहीत. त्यामुळे मंडळाला किती दंड ठोठावला, अशी विचारणा माहितीचा अधिकार कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी पालिकेच्या एफ-दक्षिण कार्यालयाकडे केली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात १५ ऑक्टोबर २०१७ अखेरीस ५८ लाख ३३ हजार इतकी थकबाकी असल्याचे स्पष्ट केले आहे. २१ मार्चपर्यंत व्याजासह ६० लाख ५१ हजार इतकी रक्कम देणे असल्याचे पालिकेने लेखी उत्तरात म्हटले आहे.
याबाबत मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी थकबाकीचा दावा फेटाळून लावला. २०१०नंतर प्रत्येक वर्षी पालिकेने पाठवलेल्या खड्ड्यांच्या नोटिशीनुसार मंडळाने दंडात्मक रकमेचा पालिकेला भरणा केला आहे. ज्या भागात भविकाच्या रांगा लागत नाहीत, त्या भागात आम्ही मंडप बांधत नाही. त्याच भागात खड्डे असल्याने पालिकेने दंड ठोठावला होता. जे खड्डे आम्ही केले नाहीत, त्यांचा दंड का भरावा, असा सवाल साळवी यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button