breaking-newsमहाराष्ट्र

लालपरी होणार हायटेक; एसटीची वेळ आता मोबाईलवर समजणार

धुळे : ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी आता हायटेक होणार आहे. इतकंच नाही तर अनधिकृत थांब्यांना देखील आता आळा बसणार आहे. यासाठी लवकरच एसटीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम बसवण्यात येणार आहे. एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना आता आपली एसटी कुठपर्यंत आली, याचा माग मोबाईल अॅपद्वारे घेणे सहज शक्य होणार आहे. एसटी गाड्यांमध्ये ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसवण्यात येणार आहे. यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्याबरोबरच स्थानक आणि आगारात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसवले जातील.

एसटीचे वेळापत्रक सुधारण्यासाठी तसेच अनधिकृत थांब्यांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ या यंत्रणेवर एसटी महामंडळाकडून काम केले जात आहे. महामंडळाला आपल्या कार्यालयीन कामाबरोबरच प्रवाशांना बसची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी देखील ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे.

यंत्रणा राबवताना त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर महामंडळाने ही यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला. निविदा काढून याचे कामही एका कंपनीला देण्यात आलं आहे. कंपनीकडून बस स्थानक, आगारांचे सर्व्हेक्षण केले जात आहे.
दिवाळीपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ही सुविधा यशस्वी झाल्यास टप्प्याटप्यात राज्यातील सर्व बस आगार आणि स्थानकांत राबवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button