breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

लसीकरणानंतर संसर्ग झालेल्या ‘त्या’ मुलीला न्युमोनिया

महापालिकेचे स्पष्टीकरण, अतिदक्षता विभागात दाखल 

गोवर-रुबेला लस टोचल्यानंतर आजारी पडलेल्या गुनगुन प्रजापती या दहा वर्षांच्या मुलीवर शीव रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गुनगुनच्या आजारी पडण्याचा लसीकरणाशी काहीही संबंध नाही, तर तिला न्यूमोनिया झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले.

शीव येथील गुरुनानक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या आणि शीव कोळीवाडा येथे राहणाऱ्या गुनगुनला २९ नोव्हेंबरला शाळेत लस टोचण्यात आली. त्यानंतर चार ते पाच तासांतच तिला उलटी- जुलाबचा त्रास सुरू झाल्याचे तिचे वडील तारकेश्वर प्रजापती यांनी सांगितले. तिच्यावर खासगी डॉक्टरांनी उपचार केले. पंरतु तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला सोमवारी शीव रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, असी माहिती प्रजापती यांनी दिली. गुनगुनला आधीच विषाणू संसर्ग झाल्याचे निदान तपासण्यांतून करण्यात आले आहे. लसीकरणाच्या वेळी कोणतीही बा लक्षणे दिसत नसल्याने तिला लस टोचण्यात आली. तिच्या फुप्फुसाला संसर्ग होऊन न्युमोनिया झाला आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर चिपळूणकर यांनी दिली.

तीव्र ताप असेल तर लस टोचली जात नाही. साधारण सर्दी- खोकला असेल तर लस टोचली जाते. लसीकरणाच्या वेळी गुनगुन खोकत होती.

लसीकरणानंतर साधारण ताप येण्याची शक्यता असली तरी न्यूमोनिया होणे अशक्य असते. पालिकेने लसीकरणाबाबत योग्य ती काळजी घेतली आहे. काही त्रास झाल्यास तत्काळ उपचार करण्यासाठी खबरदारीही घेतली आहे. त्यामुळे पालकांना कोणतीही भिती न बाळगता लस टोचून घ्यावी.  – डॉ. संदीप केळकर, बालआरोग्यतज्ज्ञ 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button