breaking-newsराष्ट्रिय

लष्करीदृष्ट्या जगातील सर्वाधिक शक्तिमान पाच देशात भारताचा समावेश

नवी दिल्ली – जगातील लष्करी दृष्ट्या सर्वाधिक शक्तिमान पाच देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारताने ब्रिटनला मागे टाकत पाचवा क्रमांक मिळवला आहे. अमेरिका आणि रशिया यांसारखे देश आपल्या लष्करावर अब्जावधी डॉलर्स खर्च करत असतात त्यांचा लष्करावरचा खर्च अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक आहे. या स्पर्धेत चीन आणि भारतही उतरले आहेत. जगातील पहिल्या पाच देशांमध्ये चीन आणि भारताचा समावेश झाला आहे जगभराच्या एकूण लष्करी खर्चापैकी 60 टक्के खर्च हे पाच देश करत असतात

स्वीडनच्या सिपरी (स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट) च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा लष्करावरील खर्च 612 अब्ज डॉलर्स आहे. तो इतर देशांच्या लष्करावरील खर्चाच्या दसपट आहे. अमेरिकेकडे 500 युद्धनौका असलेले जगातील सर्वात मोठे नौदल आहे. आणि सर्वाधिक विशिष्ट प्रशिक्षित जवान आहेत. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनने गेल्या 25 वर्षात आपला लष्करी खर्च 10 पटीने वाढवला आहे. पायदळाच्या बाबतीत चीन प्रथम क्रमांकावर आहे. 23 लाख सशस्त्र सैनिक असलेले चीनचे पायदळ जगात सर्वात मोठे आहे. तुलनेने अमेरिकेच्या सक्रिय सैनिकांची संख्या 14 लाख आहे.

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सौदीने रशियाला मागे टाकले आहे सौदीचे लष्करी बजेट 87.2 अब्ज डॉलर्स आहे.
रशिया चौथ्या क्रमांकावर असून त्याने आपल्या लष्करी खर्चात कपात केली आहे. रशियाचा लष्करावरील खर्च 66.3 अब्ज डॉलर्स इतका आहे. सन 2016 पेक्षा हा 20 टक्के कमी आहे. ब्रिटनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर आलेल्या भारताचा लष्करी खर्च 52. 5 अब्ज डॉलर्स झाला आहे. मागील वर्षी तो 51.1 अब्ज डॉलर्स होता. भारताकडे 37 युद्धनौका, 1 विमानवाहू, आणि 11 विध्वंसक जहाजे आहेत. 500 पेक्षा अधिक विमाने आहेत, 3,300 रणगाडे आहेत. भारताकडे असलेल्या 16 पाणबुड्यांपैकी 2 अणुशक्तीवर चालणाऱ्या आहेत. भारताचे पायदळ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे पायदळ आहे. येत्या काळात भारत लष्करी खर्चात वाढ करून आपले सैन्य अधिक बलशाली करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button