breaking-newsराष्ट्रिय

लग्नाच्या काही दिवस आधी तरुणीचे अपहण करुन सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या लग्नाच्या काही दिवस आधी ही घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून पोलिसांनी कलम ३२३ (जखमी करणे), कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३७६ ड (सामूहिक बलात्कार) या कलमांतर्गत आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

आग्र्यातील एका गावामध्ये ही घटना घडली. मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून पीडित तरुणी बेपत्ता होती. त्यानंतर बुधवारी तिच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली पण पीडित मुलगी त्याचदिवशी दुपारी ३.३० वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेतली.

त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी मुलीचे नातेवाईक पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आले. मंगळवारी सकाळी घराजवळून तिघांनी मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असा आरोप त्यांनी केला. आरोपींना जेव्हा मी धमकी दिली तेव्हा त्यांनी आपल्या जाळण्याचा प्रयत्न केला असे पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितले. तिच्या हातावर आणि डोक्यावर भाजल्याच्या खुणा आहेत. तिन्ही आरोपी गावातून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एक आरोपी ४२ वर्षांचा असून तो गावामध्ये शाळा चालवतो. दुसऱ्या आरोपीचा केबलचा व्यवसाय आहे तर तिसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button