breaking-newsराष्ट्रिय

रॉबर्ट वढेरा, हुडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

चंडीगढ – हरियाणा पोलिसांनी त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा आणि कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुडगांवमधील जमीन व्यवहारांत झालेल्या अनियमिततेच्या आरोपांवरून ते पाऊल उचलण्यात आले.

सुरिंदर शर्मा नावाच्या व्यक्तीने जमीन व्यवहारांतील अनियमिततेसंदर्भात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्‍यता आहे. स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रा.लि.चे संचालक असणाऱ्या वढेरा यांच्यावर जमीन व्यवहारांत मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता. तो मुद्दा भाजपने 2014 मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी लावून धरला होता.

मात्र, वढेरा यांनी त्यांच्यावरील आरोप नेहमीच फेटाळले. गुडगांवमधील चार गावांत निवासी वसाहती आणि व्यावसायिक संकुले बांधण्यासाठी हुडा यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने परवाने जारी केले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2015 मध्ये आयोग स्थापन केला. आता हुडा आणि वढेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button