breaking-newsराष्ट्रिय

रेल्वे स्थानकावर आता मिळणार कंडोम आणि सॅनिटरी नॅपकीन

नवी दिल्ली – रेल्वे बोर्डाने रेल्वेसाठी नवीन टॉयलेट धोरण मंजुर केले असून त्या अंतर्गत आता रेल्वे स्टेशनवर कंडोम आणि सॅनिटरी नॅपकीनही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचा लाभ प्रवाशांबरोबरच रेल्वे स्थानकाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनाहीं घेता येणार आहे.

रेल्वे स्थानकांच्या परिसरात स्वच्छता गृहांची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने लोक उघड्यावरच मुत्र आणि शौचाला बसत असल्याचे अनेक ठिकाणचे चित्र आहे त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छताही वाढते आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता गृहे उभारण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचे धोरण रेल्वे बोर्डाने स्वीकारले आहे.

महिला व पुरूषांसाठी अशा प्रकारची स्वतंत्र टॉयलेट्‌स रेल्वे स्थानकाच्या परिसरात उभारली जाणार असून तेथेही कंडोम आणि स्वस्तातील सॅनिटरी नॅपकीन्स विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यातून लोकांना स्वच्छतेची सवय लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. देशात एकूण 8500 रेल्वे स्थानके असून तेथे प्रत्येकी दोन स्वतंत्र स्वच्छता गृहे उभारण्याचे काम उद्योग संस्थांच्या मदतीने केले जाणार आहे. बीओटी तत्वावर ही उभारणी केली जाणार असून त्याच्या स्वच्छता आणि देखरेखीचे कंत्राट स्वयंसेवी संस्थांना किंवा खासगी कंपन्यांना दिले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button