breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुपीनगर, तळवडेत अर्धवट कामे, मनसेचे टिकाव, खो-या घेऊन आंदोलन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग १२ ( रूपीनगर, तळवडे ) मधील  रूपीनगर भागात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अर्धवट कामे राहिली आहेत. याच्या निषेधार्त मनसेच्या पदाधिका-यंनी फ क्षेत्रीय कार्यालयात आज बुधवारी (दि. 7) ठिय्या आंदोलन केले. यावेळी टिकाव, खो-या दाखवून मनसेच्या पदाधिका-यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.

महापालिकेच्या वतीने प्रभागात कामे चालू आहेत. परंतु, कामे करत असताना रस्त्यांवरिल खड्डे मात्र बुजवले जात नाहीत. माघील निवेदनाद्वारे पहिली अर्धवट कामे पूर्ण करुण नवीन कामांना सुरवात करावी, असी मागणी केली होती. परंतु, जाणुनबुजुन याकडे दुर्लक्ष केले आहे. काम करण्यासाठी ७ दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. तरी देखील कामाला सुरवात केली नाही. नवीन वर्ष सुरु होण्याआधी डांबरीकरण करण्यास सुरवात करावी. या सर्व रस्त्यांवरिल खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यास सात दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा नवीन वर्षाच्या सुरवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आता काम चालू होण्यास किती दिवस लागतील याची लेखी स्वरुपात माहिती द्यावी, यासाठी आज मनसेने आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी सचिव रूपेश पटेकर, राहुल जाधव, उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, चंद्रकांत दानवले, राजू सावळे, चिंचवड विभागाध्यक्ष मयूर चिंचवडे, पिंपरी विभागाध्यक्ष दत्ता देवतरासे, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष सुशांत साळवी, राजू भालेराव, आश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, संगीता देशमुख, स्नेहल बांगर, विष्णु चावरीया, सचिन मिरपगार, सुरेश सकट, सुरज जाधव, रवि जाधव, पंकज दळवी, गणेश उज्जनकर, प्रविण माळी, देवेंद्र निकम, कुलदीप रानडे, बालाजी पांचाळ, नारायण पठारे, दत्ता धर्मे, सागर सोनटक्के, प्रतिक शिंदे, नागेश पाटील तसेच अनेक मनसैनिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button