breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुपीनगरात कडकडीत बंद पाळून ‘भारत बंद’ला प्रतिसाद

पिंपरी / महाईन्यूज

केंद्र सरकारने शेतक-यांशी संबंधीत केलेल्या कायद्याच्या विरोधात देशभरात असंतोष पसरला आहे. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतक-यांनी ‘भारत बंद’ची हाक दिली. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला. त्यानुषंगाने रुपीनगर शिवसेना विभागाच्या वतीने बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यावर या भागातील व्यापारी व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून ‘भारत बंद’ला शंभर टक्के पाठिंबा दिला.

या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उपनेते संपर्कप्रमुख तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, सह संपर्कप्रमुख इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली रुपीनगरमधील शिवसैनिकांनी व्यापारी बंधुना भारत बंदच्या अनुषंगाने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत रुपीनगरमधील व्यापारी व व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून भारत बंदला पाठिंबा दिला.  

भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख नितिन बोंडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय भालेकर, समव्यय दादा नरळे, शाखाप्रमुख सहदेव चव्हाण, शाखाप्रमुख प्रविण पाटील, युवासेना चिटणीस अमित शिंदे, उपविधानसभा सुनिल समगीर, उपविभाग प्रमुख अभिजित गिरी, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पाटोळे, अरुण थोपटे, पांडुरंग कदम, अभिमन्यु सोनसळे, दत्तात्रय ढोले, संतोष पवार, सचिन गारगोटे, राहुल पिंगळे, अशोक भोपळे, सतीश कंठाळे, गणेश भिंगारे, नागेश आजुरे, सौरभ मोरे, तसेच शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व शिवसैनिकांनी बंदमध्ये सामील होऊन आपापल्या विभागातील दुकानदार, व्यापारी, वाहनचालक व नागरिकांना शांतता पाळत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button