breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

रुग्णालयात दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया

पुणे –  जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात  दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे. दारिद्—यरेषेखालील किंवा केशरी शिधापत्रिकाधारक असल्यास या ठिकाणी मोफत उपचार केले जातात; अन्यथा तीनशे रुपये शुल्क आकारले जाते. महिन्याला विविध प्रकारच्या 35 शस्त्रक्रिया या विभागात होत आहेत. कान-नाक-घशाशी संबंधित कॅन्सरची प्राथमिक तपासणीही केली जाते.

जिल्हा रुग्णालयात कान-नाक व घशाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी 2005 -2006 पासून हा विभाग कार्यरत आहे. सध्या या विभागात दहा खाटांची सुविधा आहे. पूर्वी या विभागाला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता; मात्र अत्याधुनिक सोयी-सुविधा व विविध आजारांवर उपचार होत असल्याने या ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढत आहे. या विभागात  दुर्बिणीद्वारेे कानाची शस्त्रक्रिया, श्रवणक्षमता चाचणी, वाचादोष उपचार, टॉन्सील, दुभंगलेले ओठ, टाळू, नाकातील विविध शस्त्रक्रिया, थॉयरॉईडसह विविध ग्रंथींवरील शस्त्रक्रिया केली जाते. कान-नाक-घशाशी संबंधित कॅन्सरवरची प्राथमिक तपासणी केली जाते, त्याबाबत मार्गदर्शन व उपचाराचीही सोय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button