breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

रुग्णालयं, केमिस्ट दुकानांची होणार आॅनलाईन तपासणी

पूणे –  रुग्णालयं, केमिस्ट दुकानं, ब्लड बॅंकांची तपासणी आता ऑनलाइन होणार आहे. राज्य सरकारकडून अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना ऑनलाइन तपासणीसाठी टॅब देण्यात आले आहेत. या टॅबच्या सहाय्याने अधिकाऱ्यांना रुग्णालयं, केमिस्ट किंवा ब्लड बॅंकेत तत्काळ तपासणी अहवाल ऑनलाइन भरावा लागणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. एफडीएचा कारभार पारदर्शक नाही, अधिकाऱ्यांचे रुग्णालय आणि केमिस्टसोबत लागेबांधे असल्याचे आरोपही झाले. त्यामुळे भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना ऑनलाइन तपासणी अहवाल भरण्याचे आदेश जारी केलेत. त्यानूसार रुग्णालयं, केमिस्टचं दुकान, ब्लड बॅंकेची तपासणीसाठी राज्य सरकार ४२८ अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना टॅब दिले आहेत. ऑनलाइन अहवाल सादर केल्याने यात फेरफार करता येणार नाही. टॅबमधील सॉफ्टवेअरच्या मदतीने अधिकारी तात्काळ सहाय्यक आयुक्त, सहआयुक्त यांच्याकडे आपले अहवाल सादर करणार आहेत. राज्य सरकारच्या आयटी विभागाने हे सॉफ्टवेअर बनवले आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट म्हणाले, “अनेकवेळा एफडीए अधिकाऱ्यांच्या तपासणी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. यापुढे एफडीए अधिकाऱ्यांनी केलेली प्रत्येक एंट्री ऑनलाइन असेल. ज्यामुळे त्यांचं काम पारदर्शक राहण्यास मदत होईल. एकदा अहवाल सादर केला की तो बदलता येणार नाही.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button