breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर FIR दाखल

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आणि राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.

कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस येथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी “मैं दुनिया में किसी से नहीं डरूंगा” असं म्हटलं आहे. गांधी जयंतीच्या निमित्ताने राहुल यांनी हे ट्विट केलं आहे. “मी जगातील कोणालाही घाबरणार नाही. मी कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही. मी असत्यावर सत्याने विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन. गांधी जयंतीच्या शुभेच्छा” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button