breaking-newsराष्ट्रिय

राहुल पंतप्रधान होऊच शकत नाहीत- आठवले

डेहराडून : २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरल्यास पंतप्रधान होऊ शकतो, असं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निशाणा साधला आहे. देशात मोदी लाट असून, ती अजून दहा ते पंधरा वर्षे कायम राहील. त्यामुळे राहुल हे पंतप्रधान होऊच शकत नाहीत, असे आठवले म्हणाले.

देशात अजूनही मोदी लाट सुरू असून पुढील १० ते १५ वर्षे ती कायम राहील. कारण मोदी हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करत आहेत, असं आठवले म्हणाले. ते डेहराडूनमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी मायावतींना दलितांसाठी जर काही करायचे असेल तर त्यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button