breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

राहुल गांधींना पुन्हा आली ज्योतिरादित्यांची आठवण; शेअर केला खास फोटो

नवी दिल्ली | महाईन्यूज

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये सहभागी झाल्यानंतर काही तासांतच राहुल गांधींना आपल्या मित्राची पुन्हा एकदा आठवण आली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्विट केला आहे. ज्यात राहुल गांधी यांच्याबरोबर ज्योतिरादित्य शिंदे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ दिसत आहेत. राहुल गांधींनी रिट्विट केलेल्या फोटोसोबत एक मजकूरही लिहिला आहे. ‘धैर्य आणि वेळ हे दोन शक्तिशाली योद्धे आहेत- लियो टॉल्‍सटॉय’, असा उल्लेख त्या मजकुरात आहे.

खरं तर ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. ज्योतिरादित्य भाजपामध्ये गेल्यानंतर राहुल गांधींनीही प्रतिक्रिया दिली होती. माध्यमांनी जेव्हा राहुल गांधींना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारल्यावर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, मी आणि ज्योतिरादित्य चांगले मित्र आहोत. तसेच आम्ही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. माझ्या घरी कुठल्याही वेळी येऊ शकले अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button