breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रीय हॉकीपटू तयार झाले पाहिजेत – एकनाथ पवार

पिंपरी- ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाडूंकडून नियमित प्रशिक्षण घेऊन शहरातून दरवर्षी किमान 4 राष्ट्रीय हॉकीपटू तयार झाले पाहिजेत, अशी अपेक्षा पालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी नेहरूनगर येथे रविवारी (दि.22) व्यक्त केली. 

पालिकेतर्फे व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमीच्या सहकार्याने नेहरूनगरातील ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमय येथे 12,14 आणि 18 वर्षांखालील मुले व मुलींसाठी 15 एप्रिलपासून शिबिर आयोजित केले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, ऑलिम्पिक हॉकीपटू विक्रम पिल्ले, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू विकास पिल्ले, आंतराष्ट्रीय पंच श्रीधरन तंबा, राष्ट्रीय खेळाडू विल्यम डिसुजा, राष्ट्रीय प्रशिक्षक मनोहर सुब्रमण्यम तसेच, राष्ट्रीय खेळाडू व हॉकीप्रेमी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, शहरातील खेळाडूंनी नियमितपणे सराव करावा. प्रशिक्षणसाठी लागणार्‍या सर्व सोई-सुविधा पालिकेच्या वतीने पुरविण्यात येतील.आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, खेळांमध्ये शिस्त, जिद्द आणि ध्येयपूर्ती या तीन महत्वाचा गोष्टी आहेत. त्यासाठी लागणारी मेहनत व चिकाटी तुमच्याजवळ असेल, तर तुम्ही सुद्धा एक दिवस विक्रम पिल्ले यांच्यासारखे ऑलिम्पिक हॉकीपटू बनू शकाल. त्यासाठी नियमित सराव केला पाहिजे. पालिकेने पॉलिग्रास मैदान व प्रशिक्षणासाठी ऑलिम्पिक खेळाडू उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा लाभ शहरातील सर्व शाळांमधील खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले.

शिबिरात पालिका व खासगी शाळांच्या एकूण 250 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यांना हॉकी स्टीक, चेंडू, टी शर्ट, दररोज पोषक आहार आणि सरावाचे आवश्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिबिर सकाळी 7 ते 9 आणि दुपारी 4 ते 6 या वेळेत 14 मे पर्यंत चालणार आहे. क्रीडा पर्यवेक्षिका अनिता केदारी यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा पर्यवेक्षक ज्ञानेश्‍वर भिसे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button