breaking-newsक्रिडा

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा : श्रेयस बोंबले, श्रुती जाधव यांची कर्णधारपदी निवड

  • महाराष्ट्राचा संघ जाहीर 

पुणे – राजस्थानमधील हनुमानगड संगरिया येथे 8 ते 10 जून दरम्यान पार पडणाऱ्या 17 वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचा कर्णधार म्हणून पुण्याच्या श्रेयस बोंबलेची, तर मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून ठाण्याच्या श्रुती जाधवची निवड करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांनी दिली. राजस्थान रोलबॉल संघटनेच्या वतीने व भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या 25 तर मुलींच्या 20 संघांचा सहभाग आहे. मुलांच्या गटात महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, आसाम, कर्नाटक, पॉंडिचेरी, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, केरळ, हरयाणा, ओडीसा आदी संघांचा तर मुलींच्या गटात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम, कर्नाटक, पॉंडिचेरी, झारखंड, केरळ, हरयाणा आदी या संघांचा सामावेश करण्यात आला आहे.

राजू दाभाडे यांनी जाहीर केलेले महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे – 
मुले – श्रेयस बोंबले (कर्णधार, पुणे), आदित्य सुतार, रोहन पाटील, वेदांत घाटे (कोल्हापूर), गौतम पटेल (जळगाव), अमितेश बोधडे (यवतमाळ), सोहम पवार, पार्थ गायकर, आगम शहा, मधुसूदन रत्नपारखी (पुणे), हर्षल घुगे (अहमदनगर), अथर्व बिहाडे (चंद्रपूर), प्रशिक्षक – प्रभाकर वडवेराव, व्यवस्थापक – जयप्रकाश सिंग

मुली – श्रुती जाधव (कर्णधार, ठाणे) श्रुती भगत, सृष्टी भोयर (चंद्रपूर), सुहानी सिंग, भक्‍ती मलशिखरे, सेजल टोळे (पुणे), सृष्टी संचेती, पूर्वा उपाध्ये (अहमदनगर), रिद्धी सिंघवी, ऐश्वर्या गोवर्धने (नाशिक), प्राची देवकाते (मुंबई), सृष्टी जाधव (कोल्हापूर), प्रशिक्षक – आनंद पाटेकर, व्यवस्थापक – पल्लवी शिंदे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button