breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांचा राजीनामा?

आज सायंकाळी पत्रकार परिषदेत करणार अधिकृत घोषणा

पिंपरी । प्रतिनिधी

राष्ट्रीय काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष सचिन साठे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. याबाबत आज सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत साठे अधिकृत भूमिका मांडतील, असे सांगीतले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतभेद होत असून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हा वाद चर्चेत आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांनी पदाचा राजीमाना दिला आहे, असा एक मतप्रवाह आहे.

दुसरीकडे,  शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठींना विचार सुरू केला आहे, असेही खासगीत बोलले जात आहे. मात्र, याबाबत साठे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत अधिकृत भूमिका स्पष्ट केल्यावरच सत्य समोर येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button