breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसला धक्का, मंत्रिपद न मिळाल्याने आमदार देणार राजीनामा

राजकारणच नको, आपलं सामजिक काम करु’ उद्या राजीनामा देणार – प्रकाश सोळुंके

बीड |महाईन्यूज|

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे अनेक आमदार नाराज आहेत. यातच एक नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांचं.

ते म्हणाले की, मागच्या वेळी पण डावलले आतापण तेच केलं. त्यापेक्षा राजकारणच नको आपलं सामजिक काम करू’ अशी नाराजी प्रकाश सोळंके यांनी बोलून दाखवली आहे. बरं इतकंच नाही तर ते उद्या राजीनामा देणार असल्याचीदेखील माहिती आहे.

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके उद्या विधानसभा अध्यक्षांना दुपारी 12 वाजता राजीनाम्या संदर्भात भेटणार आहेत. ‘पक्षाकडून वारंवार टाळाटळ होते. या वीट आला. यावेळी शेवटची टर्म म्हणून मतदार संघात समोर गेलो होतो. चौथ्यांदा निवडून आलो. पण माझ्या बाबतीतच का डावललं जात समजत नाही’ अशा शब्दात एका वृत्तवाहिनी बोलताना प्रकाश सोळंके यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button