breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडशरद पवार @80 वाढदिवस स्पेशल
राष्ट्रवादी असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने पिंपळे सौदागर येथे केक कापण्यात आला. लहान मुलांच्या हस्ते केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात राष्ट्रवादीच्या वतीने सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी असंघटित कामगार कॉंग्रेसच्या पुणे विभागाच्या अध्यक्षा मिना मोहिते यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते.