breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीच्या मिना मोहिते यांचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी असंघटित कामकागार विभागाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा मिना मोहिते यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्रदान करताना माजी महापौर राहूल जाधव, संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड, जयश्री प्रसाद, राहुल राऊत, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.

मिना मोहिते यांनी राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. भांडवलदारांच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवून त्यांनी कामगारांना कायद्याचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन संस्कार प्रतिष्ठानने त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

कर्मचारी महासंघाच्या विजयी पॅनेलला शुभेच्छा

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या निवडणुकीत अंबर चिंचवडे यांचा पॅनल विजयी झाला. याबद्दल मोहिते यांनी महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंबर चिंचवड आणि पॅनेलमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button