breaking-newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन हा मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा 

आमदार लक्ष्मण जगतापांचा अजितदादावर जोरदार हल्लाबोल

पिंपरी, दि. 12 – हल्लाबोल आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कार्यक्रम राबवून जनतेचा भ्रम निराश केला आहे. केवळ टिका करुण जनतेचा विश्वास संपादन करता येत नसतो, प्रत्यक्षात कामे केल्यावरच सत्ता मिळत असते, त्यामुळे राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन हे मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा होता, असा टोला आमदार लक्ष्मण जगताप यांनी लगावला आहे, तसेच इतरांवर टिका करण्याअगोदर आपले हात किती भ्रष्टाचारात बरबटलेत हे पाहुन दुसऱ्यावर टिका करावी, असेही त्यांनी पत्रकार परिषदेतून लगावला आहे.

 यावेळी आमदार महेश लांडगे, महापाैर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, आझम पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील घरोघरचा कचरा उचलण्यासाठी दोन विभागात कचऱ्याची निविदा राबवली होती. जनतेचा पैसा योग्य ठिकाणी आणि चुकीच्या मार्गाने जावू नये, म्हणूनच कच-याची निविदा रद्द करण्यात आली. कचऱ्याची निविदा आठ वर्षासाठी 450 कोटी रूपये खर्च करुण देण्यात येणार होते. परंतू आता ते आठ ही प्रभागात राबवली जाणार आहे. शहरात कचऱ्याचे ढिग पडू नयेत, नागरिकांना कचऱ्याची समस्या भेडसावू नये, याकरिता प्रत्येक प्रभागात वेगवेगळी निविदा राबविण्यात येणार आहे, या निविदा प्रक्रियेत एक रुपया जर घेतला असेल तर राजकरणातून संन्यास घेण्याची तयारी आहे, जनतेने नाकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही, आमचा कारभार करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच श्रीमंत महापालिकेवरची सत्ता गेल्याने राष्ट्रवादीचा मलिदा बंध झाला. त्यामुळेच अजित पवारांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. ते सारखे बसता उठता सत्ता गेल्याची खंत हल्लाबोलच्या माध्यमातून बोलून दाखवत आहेत. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट प्रवृत्तीला कंटाळून जनतेने भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली. जनतेच्या पैशाची जबाबदारी आमच्यावर आहे, तो पैसा योग्य ठिकाणी वापरून विकास कामांचा सपाटा लावल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमधे पोटसुळ उठत आहे. तोल सुटलेले नेते बेताल वक्तव्य करुण जनतेचे मनोरंजन करू लागले आहेत. त्या मनोरंजनाला जनता कधीच भीक घालणार नाही, त्यांच्या भुलथापांना बळी न पडता भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून एकहाती सत्ता दिली. त्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही.

बारामतीचे पार्सल परत पाठवून जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास कधीही ढळु देणार नाही. अजित दादांचा ” हम करे सो कायदा” यालाच जनता त्रासली होती. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील नगरसेवक भाजपात येण्यासाठी आजही माझ्या संपर्कात आहेत. देशात आणि राज्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष आहे जनतेने पक्षाला भरभरुन दिले आहे. पक्षाच्या कारभारावर जनता नाराज नाही, म्हणूनच नगरपंचायती पासून संसदेपर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे जमल नाही, ते भाजपने करुण दाखवले आहे. शहरातील शास्तीकर, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. यावर लवकरच मुख्यमंत्री महोदय निर्णय जाहीर करतील.

शहरातील पोलिस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लावला, त्याच पद्धतीने शास्तीकर, अनाधिकृत बांधकाम,कचऱ्याची समस्या, निगडीपर्यंत मेट्रो यासह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. जनतेचे प्रश्न हल्लाबोल करुण सुटत नसतात, ते प्रत्यक्ष जनतेत मिसळून काम केल्यावरच सुटतात, असाही टोला आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेवटी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button