breaking-newsपिंपरी / चिंचवड

राष्ट्रमातांचा आदर्श सर्वांनी ठेवला पाहिजे – अरुण चाबुकस्वार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. 

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस संस्थापक अरुण चाबूकस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, सुनील कुंजीर (संस्थापक स्वराज्य नागरी पतसंस्था), राजेश गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते), बी. एस. कांबळे (लेखक), शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

यावेळी सुनील कुंजीर विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, राष्ट्रमाता जिजामाता यांनी प्रजेच्या कल्याणकारी राज्य केले. जिजाईमाता, रमाईमाता, अहिल्यामाता होळकर व सावित्रीमाता फुले यांनी खूप कष्ट केले. त्या सर्वांच्या माता होत्या. त्यांचा आदर्श सर्वांनी ठेवला पाहिजे. इतर शिक्षक वर्गांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रब्जोत गील यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्याचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button