breaking-newsपिंपरी / चिंचवड

रावेत ब्रिज येथे आरटीओ अधिकारी असल्याचे सांगत ट्रकचालकाला लुटले

साखरेचे पोते घेऊन निघालेल्या एका ट्रकचालकाला तिघा जणांच्या टोळक्यांनी आरटीओचे अधिकारी असल्याचे सांगून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवार (दि.४) रात्री साडेबाराच्या सुमारास रावेत ब्रिज जवळील न्यु गोकुळ हॉटेल समोर घडली.

याप्रकरणी अशोक विष्णु सस्ते (वय २९, रा. स्वामी चिंचवली ता. दौंड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २८ ते ३५ वयोगटातील तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी अशोक सस्ते यांचे मित्र गणेश भोरे हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.एचएच/४२/एक्यु/९७६७) मध्ये साखरेचे पोते घेऊन मुंबईकडे निघाले होते. ते रावेत येथील न्यु गोकुळ हॉटेलजवळ मालाचे चलन घेण्यासाठी थांबले असता अॅक्टीव्हा दुकाची (क्र.एमएच/१४/एचएन/५०६३) वरुन आलेल्या तिघा चोरट्यांनी ते आरटीओ अधिकारी असल्याचे सांगून,”तुमचा ट्रक ओव्हर लोड आहे, तुमचा ट्रक काट्यावर न्यावा लागेल”, अशी धमकी दिली. यादरम्यान गणेश आणि आरोपींमध्ये वाद झाला. यावेळी त्यातील एकाने गणेश यांच्या खिशातील दीड हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि पळ काढला. देहुरोड पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button