breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रात्री उशीरापर्यंत चाललेल्या स्थायीत 437 कोटींच्या खर्चांना मान्यता

पिंपरी / महाईन्यूज

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या विषयपत्रिकेवरील विषयांच्या एकूण सुमारे ४३७ कोटी रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. प्रभाग क्र.११ मधील स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याचे तसेच कृष्णानगर मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २२ कोटी खर्च केले जातील.

नेहरुनगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी १ कोटी ७५ लाख खर्च होणार आहे. प्रभाग क्र.२४ मधील आरक्षण क्र.६२८ खेळाच्या मैदानात सिंथेटीक ट्रॅक बांधण्यासाठी ७२ लाख रुपये खर्च केले जातील. सेक्टर क्र.२९ मधील भाजी मंडई परिसर विकसित करण्यासाठी ४२ लाख रूपये खर्च होणार आहे.

आकुर्डी गावठाण, गंगानगर आणि इतर परिसर, पिंपळे सौदागर व रहाटणी येथील जलनि:सारण विषयक सुधारणा कामे आणि नलिका टाकण्यासाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च होतील. चिखली, कासारवाडी, चिंचवड, पिंपळे निलख, किवळे मैला शुद्धीकरण केद्रांतर्गत येणा-या मैला पंप हाऊसेसचे चालन देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे.

भोसरी येथील सर्व्हे नं.१ शेजारिल नाल्याची सुधारणा आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च येणार आहे. चिखली येथील सेक्टर क्र.१७ आणि क्र.१९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृह प्रकल्पामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ६२ लाख खर्च होतील. काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतच्या तसेच सांगवी किवळे बीआरटीएस रस्त्यावर पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्याच्या कामासाठी ३१ कोटी १८ लाख इतका खर्च होणार आहे.

भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक या रस्त्यावर बस स्थानक बांधण्यासाठी ७ कोटी ६७ लाख रूपये खर्च होतील या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button