breaking-newsमनोरंजन

‘राझी’ची शंभर कोटींच्या दिशेने वाटचाल…

अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’ चित्रपटाचा दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार करिष्मा असल्याचे दिसून येत आहेत. या चित्रपटानं आतापर्यंत एकूण ८२.०३ कोटींची कमाई केली आहे. कमाईचे आकडे पाहता ‘राझी’ लवकरच शंभर कोटींचा आकडा पार करेल यात शंकाच नाही. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढत असून चित्रपटानं शनिवारी ७.५४ कोटींचा गल्ला जमावला.

‘राझी’नं पहिल्याच आठवड्यात ५६.५९ कोटी रूपयांचा व्यवसाय केला होता. भारत आणि विदेश असे दोन्ही मिळून चित्रपटानं आतापर्यंत जवळपास ९० कोटींचा आकडा पार केला आहे. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button