breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
राज ठाकरे यांचे कर्नाटक निवडणूक निकालावर व्यंगचित्र
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवे कार्टून रेखाटले आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेले व्यंगचित्र, राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केले आहे. राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केले आहे.
घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असे कार्टून राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या घशात दाखवला आहे. अमित शाह खाली बसलेले आहेत. तर राहुल गांधींच्या बाजूला जनता दलाचे (सेक्युलर) नेते कुमारस्वामी दिसत आहेत. राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभेच्या निकालादिवशीही फेसबुक, ट्विटरवर पोस्ट केली होती. ईव्हीएमचा विजय असो, असेज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.