breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरेंपाठोपाठ फडणवीसही अयोध्येला जाणार; महापालिका निवडणुकीसाठी युतीची चिन्ह?

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी नवा ट्विस्ट टाकला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, असे महत्त्वाचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे भाजपशी युती करण्यासाठी ही अट मान्य करणार का, हे आता पाहावे लागेल.

दरम्यान, 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. 9 मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करतील, असेही नांदगावकरांनी सांगितले. याशिवाय, निवडणुका जवळ आल्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button