breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘राज्य सरकार म्हाताऱ्या बैलासारखं, टोचणी द्यावी लागते’ – नितीन गडकरी

नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. सध्या पदविधर मतदारसंघासाठी निवडणुकांचा प्रचार सुरू असून त्यासाठीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी राज्यातल्या उद्धव ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. आपलं सरकार असतं तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे सरकार म्हणजे म्हाताऱ्या बैलासारखं आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, असं ते म्हणाले.

गडकरी म्हणाले, नागपूरमधल्या ब्राडगेज मेट्रोसाठी राज्य सरकारची परवानगी मिळायला 1 वर्ष लागलं. एक वर्षानंतर मंजुरी मिळाली. त्यामुळे त्यासाठी धन्यवाद. अशा प्रसंगी कळतं की आपलं सरकार असतं तर एक महिन्यात ब्राडगेज मेट्रोला मंजुरी मिळाली असती.  त्यासाठी मी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना फोन करून फॉलोअप घेतला.

गडकरी पुढे म्हणाले, आता ट्रॅक्टरही CNGवर चालविण्याचा सरकार विचार करत आहे. असं झालं तर शेतकऱ्यांचे लाखो रुपये वाचतील. विदर्भात शेतकऱ्यांकडे किमान 1 लाख ट्रॅक्टर असतील त्यामुळे खूप फायदा होणार आहे.

नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झालं होतं. त्यासाठी कंत्राटही निघालं होतं. मात्र सरकार बदललं आणि तो प्रकल्प रखडला. असे अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पदवीधर मतदार पक्षाची जागा ही भारतीय जनता पक्षाची जागा म्हणून ओळखली जाते. नितीनजी गडकरी यांनी नेतृत्व केले. नितीनजींनी महाराष्ट्र बदलवून दाखवला. कोरोना काळात जिथे निवडणुका झाल्या तिथे आम्ही त्या जिंकल्या आहेत.

कोरोनाच्या संक्रमांच्या काळानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत आहे. विदर्भात जे काम सुरू आहे ते गडकरी यांचे काम आहे. ते या सरकारचं काम नाही. हे महाविकास आघाडी सरकारच विदर्भ विरोधी सरकार आहे, असंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button