breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा अखेर राजीनामा…

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी अखेर मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडी सरकारशी संबंधित महिलेला संधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विजया रहाटकर या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत.

एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबाबत काही निरीक्षणे नोंदविली होती. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर सरकारने तिथे नव्या अध्यक्षांची ५ फेब्रुवारीपर्यंत नेमणूक केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले होते. पण उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक आहे. त्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी स्वतःहून राजीनामा दिल्याशिवाय किंवा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांना पदावरून हटविता येत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी संध्याकाळी विजया रहाटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. गेली साडेतीन वर्षे विजया रहाटकर महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांनी महिलांसाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम आयोगाच्या माध्यमातून राबविले….

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button