breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,16,236 वर

  • मुंबईत 536, पुण्यात 421 नवे रुग्ण

मुंबई – शनिवारी दिवसभरात आढळलेल्या 2,854 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,16,236 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 1,526 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 60 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,07,824 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,189 वर पोहोचला आहे. तर सध्या 58,091 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत शनिवारी कोरोनाचे 536 नवे रुग्ण आढळले, तर 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,90,336 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,068 इतका झाला आहे. तर काल 463 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,70,135 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तसेच सुरुवातीला 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,60,194 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,763 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 751 जण कोरोनामुक्त झाल्याने पुण्यात आतापर्यंत 3,44,207 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, काल आढळलेल्या 421 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 222, पिंपरी-चिंचवडमधील 82, ग्रामीण भागातील 107 आणि कंटेनमेंट झोनमधील 10 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button