breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,96,518 वर

  • मुंबईत 586, पुण्यात 616 नवे रुग्ण

मुंबई – रविवारी दिवसभरात आढळलेल्या 3,811 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,96,518 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 2,064 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 98 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,83,905 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 48,746 वर पोहोचला आहे. तर सध्या 62,743 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 586 नवे रुग्ण आढळले, तर 16 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,86,850 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,996 इतका झाला आहे. तसेच काल 298 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,67,010 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 7,996 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 616 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,56,458 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,703 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 564 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,39,021 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 616 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 322, पिंपरी-चिंचवडमधील 102, कंटेनमेंट झोनमधील 3 आणि ग्रामीण भागातील 146 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button