breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,25,197 वर

  • मुंबईत 1,463, पुण्यात 832 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्राची रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. गुरुवारी आढळलेल्या 7 हजार 539 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 16 लाख 25 हजार 197 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 198 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 42 हजार 831 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 16 हजार 177 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 31 हजार 856 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 1 लाख 50 हजार 011 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 1 हजार 463 नवे रुग्ण आढळले, तर 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 47 हजार 332 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 961 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 1 हजार 289 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मुंबईत आतापर्यंत 2 लाख 16 हजार 558 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काही दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 41 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 17 हजार 608 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7 हजार 600 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 832 रुग्णांपैकी 369 रुग्ण हे पुणे शहरातील असून 182 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे आता पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या 1 लाख 58 हजार 756 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 86 हजार 296 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button