breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १२,८२,९६३ वर

  • मुंबईत २,१६३, पुण्यात ३,५५५ नवे रुग्ण

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. काल दिवसभरात राज्यात १९ हजार १६४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. या रुग्णसंख्येमुळे सध्याच्या घडीला राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या १२ लाख ८२ हजार ९६३ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ४५९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाबळींचा आकडा ३४ हजार ३४५ वर पोहोचला आहे. तसेच एका दिवसात १७ हजार १८४ व्यक्ती कोरोनातून बऱ्या झाल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९ लाख ७३ हजार २१४ इतकी झाली आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात २ लाख ७४ हजार ९९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गुरुवारी २ हजार १६३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ५४ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १ लाख ९२ हजार ३०१ वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा ८ हजार ६५५ इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत १ लाख ५५ हजार ६३८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून सध्या २७ हजार ६१८ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात एकूण ३ हजार ५५५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील १ हजार ५७२ रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात ४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता २ लाख ७४ हजार ४२१ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ५ हजार ४७८ इतका झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८ हजार ७९६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ६० हजार १४६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button