breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १५ हजार ३३२ वर

  • मुंबईत १,०६६, पुण्यात २,७५८ नवे रुग्ण

मुंबई – राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल 12 हजार 248 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 15 हजार 332 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 390 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या 17 हजार 757 इतकी झाली आहे. तसेच राज्यात शनिवारी 13 हजार 348 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यासह आतापर्यंत 3 लाख 51 हजार 710 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 1 लाख 45 हजार 558 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 23 हजार 382 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 6 हजार 799 वर पोहोचली आहे. तसेच काल दिवसभरात 1 हजार 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने मुंबईत आतापर्यंत 96 हजार 586 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात २ हजार ७५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात पुणे शहरातील १ हजार ३९० जणांचा समावेश आहे. तर ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर रविवारी दिवसभरात जिल्ह्यात ३ हजार १७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७९ हजार ५९७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ४८ हजार ६१४ जण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button