breaking-newsTOP Newsकोरोनाव्हायरसताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21,55,070 वर

  • मुंबईत 1,051, पुण्यात 1,600 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. याशिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात रविवारी दिवसभरात ८ हजार २९३ नवे कोरोनाबाधित आढळले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१ लाख ५५ हजार ७० वर पोहोचली आहे. तसेच काल ६२ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. याचबरोबर ३ हजार ७५३ जण कोरोनातून बरेदेखील झाले. यासह राज्यात आजपर्यंत ५२ हजार १५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २० लाख २४ हजार ७०४ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७ हजार ८ आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 051 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 827 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3 लाख 25 हजार 915 वर पोहोचली आहे. त्यापैकी 3 लाख 03 हजार 860 जण कोरोनामुक्त झाले असून 11 हजार 470 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 9 हजार 715 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात शनिवारी 1 हजार 600 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 5 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच 1 हजार 083 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 08 हजार 053 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 240 इतका झाला आहे. तर आतापर्यंत 3 लाख 88 हजार 610 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात काल आढळलेल्या नव्या 1 हजार 600 रुग्णांमध्ये पुणे शहरातील 774, पिंपरी-चिंचवडमधील 423 आणि ग्रामीण भाग व कंटेनमेंट झोनमधील 279 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button