breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20,52,905 वर

मुंबई – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काल, गुरुवारी आढळलेल्या 3,297 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20,52,905 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात 6,107 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 25 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 19,70,053 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 51,415 वर पोहोचला आहे. तर सध्या राज्यात 30,265 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 510 नवे रुग्ण आढळले, तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,12,303 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,402 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात ६२४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने सध्या ५,२५२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 554 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,91,069 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9,125 इतका झाला आहे. तसेच काल 421 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,77,521 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 554 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 256, पिंपरी-चिंचवडमधील 133, ग्रामीण भागातील 115 आणि कंटेनमेंट झोनमधील 50 रुग्णांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button