breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या पार

मुंबई – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे काल, गुरुवारी आढळलेल्या 2,886 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 20,00,878 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात 3,980 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 52 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 19,03,408 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 50,634 वर पोहोचला आहे. तर सध्या राज्यात 45,622 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

वाचा :-धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; रेणू शर्मा यांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 527 नवे रुग्ण आढळले, तर 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,04,649 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,276 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 503 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,85,810 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 6,667 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 456 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,74,736 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,987 इतका झाला आहे. तसेच काल 619 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,61,051 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 456 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 227, पिंपरी-चिंचवडमधील 103 आणि ग्रामीण भागातील 91 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button