breaking-newsTOP Newsमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,97,992 वर

  • मुंबईत 501, पुण्यात 578 नवे रुग्ण

मुंबई – देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे बुधवारी आढळलेल्या 3,015 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,97,992 वर पोहोचली आहे. तसेच दिवसभरात 4,589 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 59 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 18,99,428 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 50,582 वर पोहोचला आहे. तर सध्या राज्यात 46,769 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 501 नवे रुग्ण आढळले, तर 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,04,122 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,266 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 490 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,85,307 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 6,654 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 578 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,74,280 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,980 इतका झाला आहे. तसेच काल 557 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,60,432 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळल्या 578 नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 310, पिंपरी-चिंचवडमधील 113 आणि ग्रामीण भागातील 128 रुग्णांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button