breaking-newsमहाराष्ट्र

राज्याच्या सहकारमंत्र्यांचा बंगलाच बेकायदेशीर!

सोलापूर : सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. या प्रकरणावरून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

अग्निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर देशमुख यांनी अलिशान बंगला बांधला आहे. बंगल्याच्या बांधकामास परवानगी दिल्याप्रकरणी महापालिकेवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले होते. मात्र, अनेक दिवसांपासून त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यात बंगल्याची बांधकाम परवानगी मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button