breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक

इंदापूर – महाराष्ट्राचे राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचे निधन झाले आहे. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वत: भरणे यांनी मंगळवारी रात्री ट्विट करून याबाबत माहिती दिली. ‘दुःखद वार्ता…आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमचे वडील तिर्थरूप विठोबा (तात्या) भरणे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. उद्या बुधवार दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता मूळगावी भरणेवाडी ता. इंदापूर जि. पुणे येथे अंत्यविधी होणार आहे’, असे ट्विट भरणे यांनी आहे.

दरम्यान, विठोबा भरणे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 90 वर्षांचे होते. इंदापूर तालुक्यात तात्या नावाने ते ओळखले जायचे. प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख होती.

वडिलांच्या निधनाची वार्ता कळताच राज्यमंत्री भरणेंवर दु:खाचा डोंगर कोसळला. ‘लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे’, अशा भावना दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button