breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ७९ व्या वर्षी पायी केला शिवनेरी सर!

पुणे | प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवनेरीला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेतलं. राज्यपालांनी पायीच हा गड सर केला.

“कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते. परंतु शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत. शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते. यापुढील काळात राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही!”- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

यावेळी त्यांनी संपूर्ण शिवनेरी गडाची पायी चालत पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. विविध वास्तूंची माहिती घेत. गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि दिलखुलास गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button