breaking-newsराष्ट्रिय

राजस्थानमध्ये 15 हजारपेक्षा अधिक शतायुषी मतदार

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमध्ये 15 हजारापेक्षाही अधिका शतयुषी मतदार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक विभागाने जारी केलेल्या एका यादीनुसार राजस्थानमध्ये 100 वर्षांपेक्षाही अधिक वयाचे 15,337 मतदार असल्याचे दिसून आले आहे. या वर्षीच राजस्थान विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार यादीला अंतिम स्वरूप देण्याचे काम चालू आहे.

या यादीनुसार 15,337 मतदारांचे वय 100 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे दिसूना आले आहे. मात्र निवडणूक विभागाला या संख्येबाबत संशय आहे. त्यामुळे या शतायुषी मतदारांची पुन्हा एकदा चौकशी करून वयाची खात्री करून घ्यावी यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे याद्या पाठवून या शतायुषी मतदारांच्या वयाची खातरजमा करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर अशा उमेदवारांपैकी कोणी जिवंत नसतील तर यादीमध्ये तशी दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button