breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘राज’पुत्राच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्र्यासह शरद पवारांची उपस्थिती

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आज (27 जानेवारी) लग्नबेडीत अडकले. मिताली बोरुडे या मैत्रिणीशी त्याची लगीनगाठ बांधली गेली. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरींपर्यंत मोठे मंत्री हजर होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा राजकीय दरारा आणि राजकीय व्यक्तींशी असलेली त्यांची स्नेहाची भावना विविध कार्यक्रमातून जाणवत असते. त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमातूनच त्याची आज प्रचिती आली. राजपुत्र अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अमित आणि मिताली यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

मंत्री आणि उद्योगपतींची हजेरी

केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, उद्योगपती रतन टाटा, सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर, अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेते आमीर खान, अभिनेता रितेश देशमुख, आमदार अमित देशमुख, गायिका आशा भोसले, प्रणिती शिंदे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार आशिष शेलार, दिग्दर्शक साजिद खान आदींनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली.

ठाकरे कुटुंबियांची उपस्थिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनीही हजेरी लावली होती. जयदेव ठाकरेही यावेळी हजर होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button