breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या ‘अभद्र’ युतीवर ‘शिक्कामोर्तब’, आयुक्त चक्क भाजप कार्यालयात!

  • पालकमंत्र्यांशी बंद दाराआड तासभर केली चर्चा
  • प्रशासकीय नियमावलीचे संकेत काढले मोडीत

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात कधी घडली नाही अशी अधोरेखीत भूमिका पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी आज घेतली. भाजपचा प्रवक्ता, लाचार, दलाल, घरगडी अशी टोकाची टिपण्णी होत असतानाच आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रशासकीय शिष्टाचाराचे संकेत मोडीत काढून चक्क भाजपच्या पक्ष कार्यालयात जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बंद दाराआड ‘गुफ्तगू’ केले. राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्या अभद्र युतीत त्यांचा सहभाग असल्याचे आयुक्त हार्डीकर यांनी आज दाखवून दिले. त्यामुळे आयुक्तांवर टिकेची झोड उठली आहे.

  • पालकमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यांनी पिंपरी-चिंचवड भाजपच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून महत्वाच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. येथे येण्यापूर्वी किंवा आल्याच्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देणे अपेक्षीत होते. मात्र, त्यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पुढील दौ-याला सुरूवात केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलचे संकेत मोडीत काढत भाजपच्या पक्ष कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांशी बंद दराआड चर्चा केली.

आयुक्त हर्डीकर यांनी पक्ष कार्यालयात येणे अपेक्षीत नव्हते. पक्ष कार्यालयाच्या बाहेर अथवा अन्य दुस-या ठिकाणी पालकमंत्र्यांशी भेट घेतली असती तर ते प्रशासकीय नियमांशी संवैधानिक ठरले असते. मात्र, आयुक्तांच्या अशा वागण्यामुळे प्रशासनाची इभ्रत धुळीला मिळाली आहे. पक्षाच्या बैठकीत आयुक्तांचे काही एक काम नसते. तरी देखील ते तासभर चाललेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहिले.

  • पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सत्कार सोहळ्यात देखील पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिले होते. तरी देखील आयुक्ता हार्डीकर यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. आयुक्तांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्यावर समाजातून सातत्याने टिका टिपण्णी होत आहे. भाजपचा प्रवक्ता, दलाल, लाचार घरगडी अशी खरमरीत टिका होत असताना आयुक्तांनी भाजप कार्यालयात पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन ते खरोखर भाजपचेच असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सामाजिक स्तरातून टिकेची झोड उढली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button