breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या विविध कामांनिमित्त येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग आणि बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

  • कुठे ? – मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग
  • कधी? – २८ एप्रिल स.११.१५ वा ते दु.३.४५ वा.
  • परिणाम- सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर ब्लॉक असल्याने लोकल गाडय़ा दिवा ते परळदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. लोकल गाडय़ा वीस मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

  • कुठे? – वडाळा ते मानखुर्द दोन्ही मार्ग.
  • कधी? – २८ एप्रिल, स.११.१० ते दु. ४.१० वा.
  • परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कुठे? – बोरिवली ते अंधेरी दोन्ही धिम्या मार्गावर
  • कधी? – २८ एप्रिल, स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.
  • परिणाम- ब्लॉकमुळे सांताक्रूझ ते बोरिवलीदरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button