रविवारी कायदेविषयक मोफत मार्गदर्शनपर शिबिर
पुणे– विधी ऍडव्होकेट्सच्या वतीने दिवाणी, फौजदारी खटल्याबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रविवारी (दि. 20 मे) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत एरंडवणे, कर्वे रस्ता येथील विधी ऍडव्होकेटस, ऑफीस क्रमांक 7, साई हाऊस, महेश बॅंकेच्या वरती, रांका ज्वेलर्स मागे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ऍड. स्वप्नाली कर्पे-कोल्हे, ऍड. मोनिका ठाणेकर, ऍड. सुहास कोल्हे आणि ऍड. प्रीतेश सांडगे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. अनेकांचे जमिनी, जागाचे वाद असते. त्यामुळे नागरिकांना कायदेविषय जाणून घ्यायचे असते. तर फौजदारी स्वरूपाच्या कायद्याविषयी काही लोकांना जाणून घ्यायचे असते. या शिबिरामध्ये दिवाणी, फौजदारी दोन्ही कायद्यांविषयी मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9975426952/8668787615 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.